
सिन्नर – आगामी लोकसभा निवडणूक शांतिगिरी महाराज हे नाशिक मतदार संघातून निवडणूक लढण्याचे चिन्ह आहे. त्यांची उमेदवारीसाठी विचारणा केली असता त्यांनी होकार दर्शविला असल्याचे कळाले .नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये जय बाबाजी भक्त परिवाराने महाराजांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.नाशिक बरोबरच छत्रपती संभाजी नगर येथूनही महाराजांच्या उमेदवारीसाठी चाचपणी केली जात आहे .नाशिक लोकसभा निवडणूक रिंगणात शांतिगिरी महाराज यांना उतरविण्याचा निर्णय आज झालेल्या जय बाबाजी भक्त परिवाराच्या बैठकीमध्ये झाल्याची माहिती भक्त परिवाराचे प्रवक्ते विष्णू महाराज यांनी दिले आहे.