
भाटगांव- मागील २१ फेब्रुवारी २०२४ पासून संगणक परिचालकांचे प्रमुख मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू असून आज आंदोलनाचा १४ वा दिवस आहे तर उद्या १५ व्या दिवशी बुधवारी ०६ मार्च २०२४ रोजी राज्यभरातून हजारोंच्या संख्येने संगणकपरिचालक मुंबईत दाखल होणार आहेत व निर्णय लागेपर्यंत मुंबई सोडणार नसल्याचा सर्वांचा निर्धार केला आहे.त्या अनुषंगाने सर्वांना खालील प्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत.
१)आझाद मैदानात सकाळी १० वाजता सर्वांनी यायचे आहे.
२)ज्यावेळी आपण आझाद मैदानात येत आहात त्याचवेळी पिण्याच्या पाण्याची बॉटल,नाश्ता किंवा सोबत आणलेले जेवण मैदानात आणायचे आहे,दिवसभर कोणीही जेवण,नाष्टा इत्यादी साठी मैदानाबाहेर जायचे नाही.
३)आपली संख्या खूप मोठी असते,परंतु काही संगणकपरिचालक मैदानात न थांबता बाहेर थांबतात उद्या आपला निर्णय झालाच पाहिजे यासाठी आपले नियोजन सुरू आहे,त्यामुळे कोणीही निर्णय लागेपर्यंत मैदान सोडायचे नाही म्हणजे नाहीच.
४)प्रवासात एकमेकांना सहकार्य करावे,सर्वजण आपले सहकारी आहेत.
५)तालुका व जिल्हा कमिटी च्या संपर्कात सर्व संगणकपरिचालकांनी राहायचे आहे.
६)सर्वांना आंदोलनाच्या स्थळीच दिवसभर होणाऱ्या सर्व घडामोडींची माहिती देण्यात येईल.
राज्याच्या कानाकोपऱ्यातुन निघालेल्या सर्व संगणकपरिचालकांचे मुंबई नगरीत महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटनेकडून हार्दिक हार्दिक स्वागत तसेच सर्वांचा प्रवास सुखाचा व्हावा हिच ईश्वर चरणी प्रार्थना! असे आवाहन संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष व कार्यकर्त्यांनी सर्वांना केलेले .