
दि.15/07/2023 रोजी माणिक रघुनाथ मढवई. माध्यमिक विद्यालय कोटमगाव येथे सकाळी. ठीक 8:30 वा.शिक्षक -पालक ,विद्यार्थी सभा आयोजित करण्यात आली होती.
मुख्याध्यापिका श्रीमती मढवई अनिता माणिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.प्रथम सरस्वती मातेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
इ 9वी च्या. विद्यार्थिनी कु.प्रणिती साप्ते. व समिक्षा पवार यांनी स्वागतगीत गाईले.सर्व पालकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.संस्थापक अध्यक्ष कै. मढवई सर यांच्या कार्यकर्तृत्वाचा इतिहास श्री.प्रवीण गायकवाड यांनी सांगितला.
श्री गलांडे सर यांनी शिक्षक, पालक सभेचे महत्व, व गरज याविषयी मार्गदर्शन केले.यावेळी श्री.प्रवीण गायकवाड,श्री.उत्तम पवार.,श्री कैलास शिरसाठ
,श्री. संजय शिरसाठ,श्री. रविंद्र गायकवाड
,श्री.नंदू देवरे श्री. देविदास केंदळे,श्री.साहेबराव सुपेकर,श्री.संदीप कदम,श्री.शरद गुरगुडे,
श्री.घोलप काका,
श्री.राजेंद्र पगारे,श्री नारायण रसाळ,
श्रीमती चैताली डगळे, सौ. माया जगताप यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक, व पालक यांचे कर्तव्य व जबाबदाऱ्या याविषयी मार्गदर्शन केले.
शिक्षक,श्री केदारे सर,श्री. गांगुर्डे सर,श्री.कदम सर यांनी आपले विचार मांडले.श्री.गलांडे सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसचालन केले.श्रीमती मढवई मॅडम यांनी अध्यक्षीय भाषणातून शिक्षक पालक यांचे विद्यार्थ्यांसाठी असलेले कर्तव्य सांगितले श्री. गांगुर्डे सर यांनी आभाप्रदर्शन केले. वंदेमातरम गिताने कार्यक्रमाचा समारोप झाला.याप्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.