
नाशिक – अमेरिकेत आज एक खळबळ जनक घटना घडली आहे. आगामी राष्ट्रपती निवडणुकीत माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करण्यात आला . शनिवारी संध्याकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी अमेरिकेचे माजी राज्य राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पेन सिल्वेनियाच्या बटलर मधील एका मैदानात रॅलीला संबोधित करत असताना त्यांच्यावर एका लांब आणि उंच इमारतीवर बसलेल्या एका क्षार्प शुटरणे गोळीबार केला ,।मात्र पुढच्या सेकंदात डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी त्यांना असलेल्या स्नायपरणे सुटला ठार केले. अमेरिकेत बेकायदेशीर रित्या आलेल्या परदेशी नागरिकाबद्दल अध्यक्ष जो बायडेन यांच्या धोरणावर टीका करत असताना डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पाच गोळ्या घालण्यात आल्या .त्यातील एक गोळी ही डोनाल्ड ट्रम्प यांच्या कानाला चाटून गेली. यावेळी सिक्रेट सर्विस एजंट यांच्या दिशेने धाव घेत त्यांना सुरक्षित केले. तर याचवेळी सुरक्षेसाठी त्यांना असलेल्या स्नायपरणे शूटरला ठार मारले. डोनाल्ड ट्रम्प वर गोळी झाडण्या जाणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली असून थॉमस मेथू (वय 20) असे त्याचे नाव आहे. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांना त्याला का मारायचे होते हा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही.