
28 नोव्हेंबर राष्ट्रीय विज्ञान दिवस डॉक्टर सी व्ही रमण यांचा जन्मदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळस रामाचे येथे विद्यार्थ्यांनी छोटे छोटे प्रयोग करून दाखविले. पाण्याची घनता, हवेचा दाब, सौर लॅम्प वरील डीजे, हवेच्या दाबावर आधुनिक तोफ, जेसीबी, लिफ्ट, अंधश्रद्धे वरील प्रयोग, चुंबकीय जादू, पारदर्शकता, हवेची घनता यावर आधारित विद्यार्थ्यांनी प्रयोग सादर केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री दलाल सर यांनी केले. मुलांना आणि उपस्थितांना प्रयोगाचे महत्त्व समजावून सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माननीय किशोर वाणी पोलीस यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त पाच डझन वह्या आणि पेन्सिल पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांना देऊन वाढदिवस साजरा केला.कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री एसी सर, पाटील सर, मोरे सर, पालवी सर, पैठणकर मॅडम, सोनवणे मॅडम, कसबे कर मॅडम, मोरे मॅडम, भडके मॅडम, जाधव मॅडम, पंडित मॅडम. यांनी सहकार्य केले. छोट्या मुलांनी सादर केलेले प्रयोग पाहण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष माननीय श्री आप्पा त्रिभुवन तसेच उपस्थित मान्यवर पालक उपस्थित होते.सर्व पालक आणि प्रयोग दाखविणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे आभार आणि अभिनंदन मुख्याध्यापक श्री नवनाथ बटवल यांनी केले.