
सिन्नर येथील पोलीस ठाण्याच्या निरीक्षक पदाचा पदभार संभाजी गायकवाड यांनी नुकताच स्वीकारला आहे. मागील दोन महिन्या अगोदर सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांची बदली झाली होती. त्यानंतर चंद्रशेखर यादव यांनी पदभार स्वीकारला होता. मात्र अवघ्या पंधरा दिवसातच त्यांची बदली स्वच्छेने पुणे येथे झाली होती. तदनंतर जवळजवळ एक महिना झाला तरी सिन्नर पोलीस ठाण्याला निरीक्षकाची जागा खाली होती. त्यामुळे ठाण्याचा कारभार सहाय्यक निरीक्षक यावर निर्भर होता. परंतु आता संभाजी गायकवाड यांनी पदभार सांभाळला त्यामुळे जनसामान्यांना दिलासा मिळाला आहे