आयटीआय मध्ये तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या व स्वयंरोजगाराच्या अनेक संधी आमदार सत्यजित दादा तांबे
प्रतिनिधी श्री .ज्ञानेश्वर भवर कोटमगाव

मनमाड- येथील महाराष्ट्र शेतकरी सेवा मंडळ संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय टी आय)मनमाड येथे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ पदवीधर मतदारसंघाचे आमदार मा. सत्यजित दादा तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी बोलताना आमदार सत्यजित दादा तांबे यांनी सांगितले की आयटीआय मध्ये तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या व स्वयंरोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत.याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे श्री सतीश बोरसे व श्री दर्शन अनिल आहेर उपस्थित होते. संस्थेची सरचिटणीस डॉ. राजेंद्र शेजवळ यांनी उपस्थितांचे स्वागत केले व श्री.गंभीरे सर यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री प्रकाश शेजवळ उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री गंभीरे सर ,श्री.गरुड सर ,सौ. सोनवणे मॅडम ,डी एस आहेर व एच वाय कुलकर्णी यांनी प्रयत्न केले.