लासलगाव महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी साजरी
मुख्य संपादक राहुल वैराळ

लासलगाव येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आज २६ फेब्रुवारी रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली..!
‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला,,,!’
थोर विचारवंत, लेखक, साहित्यिक, समाजसुधारक, विज्ञाननिष्ठ, कवी, नाटककार, क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेला डॉ.विलास खैरनार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच यावेळी डॉ.संजय निकम रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रदीप सोनवणे आणि प्रा.देवेंद्र भांडे व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे, उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे, डॉ.सोमनाथ आरोटे यांचे मार्गदर्शन लाभले.