नाशिक रोड येथील कौटुंबिक न्यायालयात महिला न्यायाधीशावर हल्ल्याचा प्रयत्न
नाशिक प्रतिनिधी
नाशिक रोड येथील कौटुंबिक न्यायालयामध्ये फारकतीच्या दाव्याची सुनावणी चालू होती. त्यानंतर पुढील तारीख दिल्या नंतर संबंधित पक्षकार तीन महिलांनी गोंधळ घातला, एवढेच नाही तर महिला न्यायाधीशावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. वेळीच संबंधित पक्षकार महिलांना, उपस्थित वकील कर्मचाऱ्यांनी आडविले, त्यामुळे पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी तीनही महिला विरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणून न्यायालयीन कामकाज बंद पडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यांमध्ये गौतमी राजेश परांजपे उर्फ गौतमी सुधीर देशमुख, वैशाली सुधीर देशमुख, गायत्री सुधीर देशमुख राहणार मुंबई असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयताचे नावे आहेत. नाशिक रोड कौटुंबिक न्यायालयाचे कर्मचारी गुणवंत कोल्हे यांच्या फिर्यादीनुसार संशयित गौतमी परांजपे उर्फ गौतमी देशमुख यांच्या फारकतीचा दावा कौटुंबिक न्यायालयात सुरू होता, बुधवारी (४)दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास न्यायालयीन कामकाज सुरू असताना संशयीतांना पुढील तारीख देण्यात आली, त्यामुळे नाराज झालेल्या गौतमी तिच्या आई व बहिणीने न्यायालयात आरडाओरड करीत मोठा गोंधळ घातला. त्यावेळी न्यायाधीश श्रीमती रेखा पांढरे या त्यांच्या दालनामध्ये जात असताना संशयतांनी त्यांच्या दालनाकडे धाव घेत त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी उपस्थित कर्मचारी व वकिलांनी संशयीतांना आडविले त्याची समजूत काढण्यासाठी खूप प्रयत्न केला, मात्र तीनही महिला समजण्याच्या परिस्थितीत नव्हत्या त्यामुळे न्यायालयीन कामकाज बंद पडले. घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस घटनास्थळी हजर झाले. त्यांनी तिन्ही संशयीतांना ताब्यात घेत नाशिक रोड पोलीस ठाण्यात नेले. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणणे व न्यायालयीन कामकाज बंद पाडून न्यायाधीशावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक काळे हे पुढील तपास करीत आहे.