अर्थकारणआपला जिल्हाआरोग्य व शिक्षणक्राईम स्टोरीक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

मनमाड येथे दोन शाळकरी मुलांचा ट्रकखाली सापडून दुर्दैवी मृत्यु….

ज्ञानेश्वर पोटे

मनमाड – येथे चांदवड रोडवर दोन
शाळकरी मुलांचा ट्रकखाली सापडून दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.या घटनेमुळे मनमाड शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मनमाड येथील चांदवड रोडवर कृषी उत्पन्न बाजार समिती समोर चांदवड कडुन मनमाड कडे येत असताना रस्त्यात अचानक गायी मोटारसायकलवर आल्याने त्यांना वाचवताना मोटारसायकल स्वाराचा तोल जाऊन दोन शाळकरी मुलांसह मोटारसायकल रस्त्यात पडली.आणि त्याच वेळी पाठीमागून येणाऱ्या ट्रकने या दोघांनाही अक्षरशः चिरडले. यात मोटारसायकल वरील शालेय विद्यार्थी आदित्य मुकेश सोळसे व वैष्णवी प्रवीण केकान राहणार हनुमान नगर, मनमाड या दोन शाळकरी मुलांचा जागेवर मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की, या दोन्ही मुलांचा चेहरा अपघातात छिन्नविछिन्न झाल्यामुळे त्यांची ओळख पटने देखील शक्य नव्हते.या धक्कादायक अपघाताने स्थानिक नागरिकांनी संतप्त होऊन काही काळ रास्ता रोको ही केला होता.स्थानिक नागरिकांनी वेळीच मदत करत त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ट्रक चालकाला ताब्यात घेऊन पुढील तपास मनमाड शहर पोलिस करत आहे.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.