
साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंगी गड या ठिकाणी आज सोमवार दिनांक 5 डिसेंबर या दिवशी गावाच्या वतीने बंद पुकारण्यात आलेला आहे या गावाच्या बंद होण्याचे कारण असे की या ठिकाणी जे देवस्थान आहे या देवस्थाने एम एस एफ नावाचे सिक्युरिटी उपस्थित केलेले आहे जे 40 सेक्युरिटी आहे त्याचा खर्च आहे एक ते सव्वा कोटी रुपये ग्रामस्थांना मान्य नाही त्यांच्या असे म्हणणे आहे की गडावरील जे मुले गावांमध्ये फिरतात त्यांना देवस्थान मध्ये कामावरती घेण्यात यावे मुलांना कामावरती रुजू करण्यात यावे तसेच गावामध्ये काही विधवा महिला ज्यांच्या घरातील व्यक्ती देवस्थान मध्ये काम करत असताना मयत झालेली आहेत त्यांना कामावरती घ्यावे परंतु देवी संस्थान या गोष्टीला दुजोरा देत नाही म्हणतात की आम्ही यांना कामावर घेऊ शकत नाही तसेच या ठिकाणी असलेली रोपेवे मध्ये असलेले मॉल हे त्वरित बंद करून रोपवेचा टाईम सकाळी पाच सायंकाळी सहा वाजेपर्यंत ठेवण्यात यावा परंतु सप्तशृंगी गडावरील देवी संस्थानचे एकही विश्वस्त नी ग्रामस्थाशी संपर्क साधण्यासाठी आले नसल्यामुळे गावातील ग्रामस्थांमध्ये राग निर्माण झाला होता.
हातावरती काळ्याफिठी बांधून निषेध व्यक्त करण्यात आला अशा अनेक गोष्टींना धरून संपूर्ण सप्तशृंगी गड हा आज बंद करून पहिली पायरी या ठिकाणी अनेक विविध घोषणांनी दुमदुमून गेला आहे सप्तशृंगी गडावरील दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास नव्हता भावीकीनी व्यवस्थितपणे मंदिरामध्ये जाऊन आई भगवती चे दर्शन घेत होते यावेळेस गडावरील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने पहिली पायरी या ठिकाणी उपस्थित होते