माणिक रघुनाथ मढवई माध्यमिक विद्यालयत शिवजयंती उत्साहात साजरी
प्रतिनिधी .ज्ञानेश्वर भवर

आज दि.१९फेब्रू.२०२४ रोजी.माणिक रघुनाथ मढवई माध्यमिक विद्यालय कोटमगाव येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली..प्रथमतः शिवाजीमहाराज प्रतिमा व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मढवई माणिक रघुनाथ (सर) यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. व शिवरायांची आरती घेण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी.कू.कोमल बाजीराव कराटे (इ.१०)ही विद्यार्थिनी होती. जेष्ठ शिक्षक श्री गलांडे सर यांनी सूत्रसंचालन केले. व शिवाजीराजांनी केलेले कार्य कथन केले.मुख्याध्यापिका श्रीमती अनिता माणिक मढवई,श्री कदम सर,श्री. गांगुर्डे सर श्री.केदारे सर यांनी शिवरायांनी स्वराज्य स्थापून रयतेचे राज्य कसे निर्माण केले.याविषयी माहिती सांगितली.विद्यार्थ्यांपैकी कू.ललित गांगुर्डे,गायत्री वैद्य, प्रांजल मोरे,प्रणिती साप्ते,प्राची मोरे, नीलम आहेर,समीक्षा गांगुर्डे, यांनी शिवरायांची शिकवण व शिवरायांचे जीवनकार्य सांगितले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री गलांडे सर श्री केदारे सर, श्री गांगुर्डे सर, श्री कदम सर ,श्री दिवटे सर, श्री देवढे सर यांनी विशेष परिश्रम घेतले. वंदेमातरम् गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.