
सत्यशोधक बहुजन आघाडी च्या माध्यमातून सिंहगडाच्या पायथ्याशी कोंढणपुर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती व आदिवासी कातकरी यांच्या १०० जातीच्या दाखल्यांचे वाटप कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आघाडी चे संस्थापक अध्यक्ष सचिन बगाडे यांनी जगात एकमेव राजा असा आहे की त्याची जंयती उपेक्षित कष्टकरी व विविध जातीधर्माचे लोक माझा राजा म्हणून उत्साहात जंयती साजरा करतात याचे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेचे स्वराज्य निर्माण केले होते यावेळी माऊली प्रतिष्ठान चे खजिनदार पांडुरंग हनवते यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले, कार्यकर्माचे प्रमुख पाहुणे सीमा जगताप यांनी आदिवासी बांधवांना बाबासाहेब आंबेडकर यांचा शिका संघटीत व्हा,संघर्ष करा,हा मुलमंत्राची आज गरज आहे असं सांगितलं यावेळी कोंढणपुर ग्रामपंचायत चे सरपंच जयश्री ताई मुजुमले, ग्रामपंचायत सदस्य सानप सर ग्रामपंचायत सदस्य जरांदे साहेब श्रीराम नगर ग्रामपंचायत सदस्य संतोष ओव्हाळ, उपस्थित होते यावेळी आघाडी चे कार्यकर्ते अमोल खुडे यांची श्रीरामनगर ग्रामपंचायत उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल विशेष सत्काराने सन्मानित करण्यात आले तर क्रांतीवीर नाग्या म्हादु कातकरी पुरस्काराने सुमन जाधव यांना सन्मानित करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते आदिवासी कातकरी जातीचे १०० दाखले वाटप करण्यात आले यावेळी सुत्रसंचालन नागेश गायकवाड यांनी केले तर आभार राहुल सोनवणे यांनी मानले यावेळी प्रमुख वक्ते प्रा इतिहास संशोधक सुहास नाईक व प्रमुख वक्ते दिपक कसाळे यांनी उपस्थितांना आपल्या भाषणाने मंत्रमुग्ध केले यावेळी अनेक मान्यवरांची भाषणे झाली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय पवार लहु पवार संदिप पवार मुन्ना खुडे पायल खुडे सोनु जाधव यांनी परिश्रम घेतले