नूतन माध्यमिक विद्यालय भाटगांव येथे कै.राजीव निवृत्ती पोटे यांच्या स्मरणार्थ सूर्यनमस्कार स्पर्धा…
ज्ञानेश्वर पोटे

भाटगांव – शिक्षण मंडळ भगूर,संचलित चांदवड तालुक्यातील नूतन माध्यमिक विद्यालय भाटगांव येथील SSC १९८७ बॅचच्या वतीने दरवर्षी रथसप्तमी निमित्ताने नू.मा.वि.चे १९८७ च्या बॅचचे माजी विद्यार्थी व सीमा सुरक्षा दलातील माजी अधिकारी कैलासवासी राजीव निवृत्ती पोटे यांच्या स्मरणार्थ नू.मा. विद्यालयात सूर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन केले जाते. याप्रसंगी विद्यालयातील सर्व विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होतात. शनिवार दिनांक ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता या स्पर्धेचे आयोजन विद्यालयात करण्यात आले होते.
याप्रसंगी संस्थेचे सदस्य व शालेय समितीचे अध्यक्ष माननीय श्री.चंद्रकांत अण्णा पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.अनिलभाऊ पोटे, संस्था सदस्य मा.म्हसु काका पोटे, संस्था सदस्य मा.कैलास आप्पा पाटील, शाळेचे मुख्याध्यापक मा.सारूक्ते सर, पर्यवेक्षक मा.बोढारे सर व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.