नरहरी झिरवाळ यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल कळवण तहसीलदार यांना निवेदन देत आदिवासी संघटना आक्रमक
वैभव गायकवाड

बीड येथे १२फेब्रुवारी ला झालेल्या धनगर समाजाच्या सभेत यशवंत सेनेचे बाळासाहेब दोडकले यांनी आदिवासी समाजाचे नेते विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याबाबत चुकीचे वादग्रस्त विधान केल्याबाबत नाशिक जिल्ह्यातील सर्व आदिवासी संघटनेचे पदाधिकारी यांनी कळवण तहसीलदार व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी आदिवासी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बोलताना हे पण सांगितलं की जर कोणी आमच्या आदिवासी नेत्यांबद्दल चुकीचं विधान करेल तर आदिवासी संघटना असे चुकीचे विधान करणाऱ्या वर कायदेशीर कार्यवाही व्हावी यासाठी निवेदन देणार तसेच तहसील व पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी वरील विधानाची लवकरात लवकर चौकशी करून त्याच्यावर गुन्हा दाखल करून लवकरात लवकर कारवाई व्हावी नाहीतर आदिवासी संघटनांकडून राज्यभरात तिव्र आंदोलन करण्यात येईल असं आदिवासी संघटनांकडून बोलताना सांगितलं आहे तसेच आदिवासी धनगर आरक्षणाचा जो मुद्दा बॉम्बे हायकोर्टात चालू होता त्यामध्ये न्यायालयात अंतिम सुनावणी पार पडली त्यात बॉम्बे हायकोर्टाचा धनगर आदिवासी आरक्षणाचा निकाल आदिवासींच्या बाजूने लागल्याने सर्व आदिवासी संघटनांनी कळवण येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी आंनदोस्तव साजरा केला यावेळी सुदाम भोये, सोनिराम गायकवाड,बबन खिल्लारी, युवराज थैल, सचिन सोनवणे, विशाल जोपळे, संजय ठाकरे,रवि बहिरम, ज्ञानेश्वर राऊत, आदी उपस्थित होते.