गोकुळचे माजी चेअरमन स्व दिलीपराव पाटील यांची शिरोळमध्ये रविवारी जयंती
शिरोळ : प्रतिनिधी

शिरोळ – माजी सरपंच, गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन व शिरोळ नगर परिषद संकल्पनेचे जनक स्वर्गीय दिलीपराव माने – पाटील (दादा) यांच्या ७१ व्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
रविवार (दि १८ ) सकाळी ९ वाजता श्री दत्त साखर कारखाना मेन गेट समोरील माने -पाटील निवासस्थानी हा कार्यक्रम होणार असून सदर कार्यक्रमास दादाप्रेमी कार्यकर्त्यांसह सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामदास गावडे यांनी केले आहे.
स्वर्गीय दिलीपराव माने -पाटील दादा यांनी बहुजन समाजाचे नेतृत्व करून सर्वसामान्य ,गोरगरीब जनतेच्या न्याय हक्कासाठी तसेच त्यांना सर्वतोपरी सहकार्य करून लोकाभिमुख कार्य केले आहे. शिरोळ ग्रामपंचायत ,गोकुळ दूध संघ व विविध संस्थांच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर नागरिक यांच्या हितासाठी आयुष्य खर्ची घातले आहे . त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने होत असलेल्या अभिवादन कार्यक्रमास सामाजिक .,राजकीय , सांस्कृतिक , शैक्षणिक यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून दादा प्रेमी कार्यकर्तेसह सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री गावडे यांनी केले आहे.