
नूतन माध्यमिक विद्यालय भाटगांव ता. चांदवड (नाशिक) येथील शाळेत सीमा सुरक्षा दलातील माजी अधिकारी व शाळेचे माजी विद्यार्थी कै.राजीव पोटे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज दिनांक 16/2/2024 रोजी रथसप्तमीच्या(जागतिक सूर्य नमस्कार दिवस)दिवसी भव्य सूर्य नमस्कार स्पर्धा आयोजित करण्यात आली.या स्पर्धेचे उदघाटन शालेय समितीचे अध्यक्ष मा.श्री.चंद्रकांत शिवराम पाटील (आण्णा) यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.श्री.अनिलभाऊ पोटे ,शालेय समिती सदस्य मा.श्री कैलासआप्पा पाटील, तसेच मुख्याध्यापक श्री. सानप सर , पर्यवेक्षक श्री.बोढारे सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
शाळेतील इयत्ता पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
सदर स्पर्धा सन १९८७ ची दहावीची बॅच प्रायोजित करते.
या स्पर्धेचे सुत्र संचालन श्री.डंबाळे सर यांनी केले.