
भारतीय अन्न मानके प्राधिकरणाच्या अर्थात fssai च्या अभियानांतर्गत भरड धान्यं आणि आहाराच्या योग्य सवयींचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दिंडोरी इथे मिलेट अर्थात भरड धान्यं मेळाव्याचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्या हस्ते संपन्न झाले.
देशासाठी युवा वर्गाला खूप चांगलं काम करायचं आहे, त्याकरता शरीर आणि मन तंदुरुस्त असणं गरजेचं आहे, तेव्हा आहाराच्या योग्य सवयींबरोबर नियमित व्यायाम आणि वाचनाच्या सवयी विद्यार्थ्यांनी लावून घ्याव्यात असे डॉ भारती पवार यांनी यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना सांगितले विद्यार्थ्यांनी आहाराच्या बाबतीत जागरूक राहून हिरव्या भाज्या, स्थानिक रानभाज्यांचा आहारात आवर्जून समावेश करावा, असं त्या म्हणाल्या. यावेळी मेळाव्यात भरड धान्य वापराबाबत झालेल्या विविध स्पर्धां मधील विजेत्यांना बक्षिसं देण्यात आली व fssai च्या दिनदर्शिकेचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं.
यावेळी मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस एडवोकेट नितीन ठाकरे ,जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव,शाम मुरकुटे, योगेश बर्डे, उज्ज्वला उगले, शाम बोडके,सुनील पवार, रणजित देशमुख, वसंत काळे, राजेंद्र वरडे, अमोल खोडे, मित्रानंद जाधव, निलेश खोडे, किशोर ढगे, अमर राजे, बाळासाहेब सोनवणे, तुषार वाघमारे, कैलास धात्रक, काका वडजे, महेंद्र पारख, कुंदन जावरे,अनिल जाधव,मयूर जैन तसेच FSSAI कार्यकारी संचालक इनोशी शर्मा , प्रिती चौधरी,शरद राव,जीथा के,डॉ के यू मेठेकर,सुकांत चौधरी, ज्योती हरणे,अमोल जगताप,चेतना भिसले,अजय खिरनार,निलेश दुंधळे,बीडीओ नम्रता जगताप सह FSSAI चे अधिकारी व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.