
सिन्नर – दारिद्र्यरेषेखालील महिलांना रेशन दुकानात आता रेशन सोबत साडी देखील मिळणार असल्याचे वक्तव्य राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केली. रेशन मधून मिळणारी साडी मालेगावातून मिळणार आहे. येवला येथील शाल, पैठणी, घोंगडी आधी पाच वस्तू तयार करणाऱ्या कारागिरांची नोंदणी करण्यात येणार असल्याचे पाटील म्हणाले. यंत्र कामगारांना काम मिळावे म्हणून साडी तयार करण्यात आल्याचे पाटील म्हणाले. वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील हे आज नाशिक जिल्ह्यातील मालेगाव दौऱ्यावर आहेत, यावेळी ते बोलत होते नोंदणी कामगारांना दहा हजार रुपये फेस्टिवल बोनस म्हणून देण्यात येणार आहे. कामगारांना वयाच्या साठव्या वर्षानंतर लाईफ टाईम बोनस देण्याची घोषणा देखील पाटील यांनी केली. वस्त्रोद्योग समितीने केलेला रिपोर्ट तयार असून वीज सवलत देण्यात यावी अशी मागणी मान्य करण्यात आल्याचे पाटील म्हणाले. तसेच दारिद्र्यरेषेखालील महिलांना रेशन दुकानात रेशन सोबत साडी मिळणार असल्याचे पाटील म्हणाले.