टाकळी विंचूर ग्रामपंचायत व प्राथमिक विद्यालय तसेच रयत संस्था न्यू इंग्लिश स्कूल येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
मुख्य संपादक राहुल वैराळ

टाकळी विंचूर तालुका निफाड येथे ग्रामपंचायतचे वतीने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन गावच्या सरपंच सौ अश्विनीताई जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले प्रजासत्ताक दिनानिमित्त गावातील प्रतिष्ठित व्यक्ती पंचायत समिती माजी सभापती शिवाजी सुराशे ,उपसरपंच ज्ञानेश्वर मोकाटे, सदस्य केशव जाधव, संतोष राजोळे, हरीश गवळी, राम बोराडे, नाना राजगिरे ,ग्रामपंचायत सदस्या ललिता पठारे, निता आहिरे, संगीता पाचोरकर, वर्षा काळे, पूनम आमले, ज्योती सुराशे, दिपाली लाड, पोलीस पाटील विलास काळे, तंटामुक्ती अध्यक्ष शंकर शिंदे, उपाध्यक्ष संदीप पवार, रविराज शिंदे ,बापूसाहेब जाधव, बाळासाहेब मोकाटे, संतोष बोराडे, बंडू जाधव, कैलास पठारे, राजाराम शिंदे, दत्ता मापारी, ग्रामपंचायत सदस्य अनिल माळी, शांताराम वैराळ, व गावातील ग्रामस्थ हजर होते.
प्राथमिक विद्यालय येथील ध्वजारोहणाचा मान टाकळी गावचे उपसरपंच ज्ञानेश्वर मोकाटे यांना देण्यात आला
आज प्रजासत्ताक दिनी निमित्ताने रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल टाकळी विंचूर शाळेमध्ये शाळेचे उपाध्यक्ष व तसेच वज्रेश्वरी पतसंस्थेचे माजी चेअरमन मा.श्री वसंतराव शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा.श्री वामनराव जेऊगाले यांनी भूषविले उपस्थित पंचायत समितीचे माजी सभापती टाकळी गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक विविध संस्थांचे पदाधिकारी ,शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्र उपस्थित होते.