ताज्या घडामोडी

मुसळगाव एमआय डी सी तील आदिमा कंपनीला भीषण आग.

सिन्नर प्रतिनिधी

सिन्नर- शहरानजीक मुसळगाव एमआयडीसीमध्ये आदिमा केमिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिनांक 2 दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. कंपनीमध्ये एवढा मोठा स्पोट झाला की संपूर्ण एमआयडीसी परिसर दणाणून गेला. एमआयडीसी परिसरात सर्वत्र धुराची लोड पसरले आगी मध्ये कंपनीचे लाखोचे नुकसान झाल्याची बातमी आहे. कारखान्यांमध्ये 50 ते 60 कामगार काम करत होते. परंतु सुदैवाने जीवित हानी झालेली नाही. मुसळगाव – गुळवंच ला जाणाऱ्या रस्त्याच्या शेवटच्या टोकाला आदिमा केमिकल ही कंपनी आहे. दुपारच्या सुमारास अचानक कंपनीला आग लागली काही क्षणातच आगिने रुद्ररूप धारण केले. व आकाशात सर्वत्र आग व धुराचे लोड पसरले. त्यामुळे त्या परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. आगीची माहिती मिळताच सिन्नर नगर परिषद व एम आय डीसी चे अग्निशमन बॉम्ब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सिन्नर तालुका सहकारी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन नामकर्ण आवारे ,व्यवस्थापक कमलाकर पोटे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत बाविस्कर हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले. आगेची भीषणता मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे आग विझवण्यासाठी अग्निशामनच्या जवानांना अथक परिश्रम घ्यावे लागले आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप कळाले नसून पुढील तपास पोलीस निरीक्षक यशवंत बाविस्कर हे करत आहेत.

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.