ताज्या घडामोडी
चोपडा बसस्थानकातील महिलेच्या पर्समधुन दोन लाखांचे दागिने लंपास

चोपडा बसस्थानकातील महिलेच्या पर्सची अलगद चैन उघडत भामट्याने गर्दीच्या फायदा घेत दोन लाख १२ हजारांचे दागिने लंपास केले. हा प्रकार मंगळवारी दुपारी घडला. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोपडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अधिक माहिती अशी की, रवींद्र मंगल पाटील, (रा. वढोदा ता. चोपडा) हे आपल्या पत्नीसह मंगळवार १४ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता चोपडा बसस्थानकात आले होते. या वेळी गर्दीच्या फायदा घेत अज्ञात चोरट्यांने रवींद्र पाटील यांच्या पत्नीच्या गळ्यात असलेल्या पर्सची चैन उघडत दोन लाख १२ हजारांचे दागिने लंपास केले. काही वेळेनंतर हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसात धाव घेण्यात आला. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे करीत आहे.