राज्यातील अनुदानित शाळा विनाअनुदानित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय ,पालकांचे तीव्र आंदोलन
नाशिक प्रतिनिधी
नाशिक – राज्यातील अनुदानित शाळा विनाअनुदानित करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे संतप्त झालेल्या पालकांनी त्याचा विरोध करीत शिक्षण कार्यालयात आंदोलन केले. पालकांची भूमिका ही राज्य शासनाला कळविण्यात येईल असे आश्वासन शिक्षण उपसंचालकांनी दिले. राज्य शासनाने अलीकडच्या काळामध्ये एक स्वतंत्र आदेश काढून ज्या शासनाच्या अनुदान घेणारा शाळा आहेत त्या विनाअनुदानित, म्हणजे कोणतेही अनुदान राज्य सरकारकडून त्या शाळांना मिळणार नाही असा निर्णय घेतला. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर खाजगी शाळांची फी वाढणार आहे .आणि त्यामुळे पालकांना मोठा भुर्दंड सहन करावा लागणार आहे .त्यामुळे संतप्त झालेल्या नाशिक मधील पालकांनी एकत्र येऊन नाशिक रोड येथील शिक्षण उपसंचालकाच्या कार्यालयामध्ये तीव्र आंदोलन केले. त्यामुळे काही काळ या ठिकाणी खूप मोठा गोंधळ निर्माण झाला होता .परंतु वेळेतच पोलिसांनी आपला बंदोबस्त ठेवीत आंदोलन आटोक्यात आणले. त्यानंतर सुमारे दोन एक तासाच्या आंदोलनानंतर शिक्षण उपसंचालक हे कार्यालयात आले. आणि त्यांनी या ठिकाणी पालकांना आपली भूमिका ही शासनाला कळविण्यात येईल त्यानंतर शासन सांगेल त्याप्रमाणे निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.