
राज्यातील पहिले वातानुकूलित बस स्थानक मेळा बस स्थानक नाशिक मध्ये होणार आहे उद्या शनिवार (10) रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. ठक्कर बस स्थानकाजवळ 1.73 हेक्टर जागेमध्ये हे बस स्थानक असून 6033.22 चौरस मीटर मध्ये या इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. नागरिकांना स्थानकामध्ये प्रवेश करण्यासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार असणार आहे. व या स्थानकाच्या तळघरात पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. या बस स्थानकात वीस फलाट असून यापैकी 4 फलाट वातानुकूलित करण्यात आलेले आहेत. चालक व मालक महिला व पुरुषासाठी स्वतंत्र विश्रामगृह तयार करण्यात आले आहे. मातांना लहान बाळाची काळजी घेण्यासाठी स्वतंत्र हिरकणी कक्षा तयार करण्यात आला आहे. मंडळाच्या अधिकाऱ्यांसाठी सुद्धा स्वतंत्र विश्रामगृह तयार करण्यात आले आहे स्वतंत्र वाहतूक नियंत्रण कक्ष नागरिकांसाठी उपहारगृह व स्वतंत्र पोलीस चौकी अशा प्रकारे स्वतंत्र सुविधा या बस स्थानकामध्ये करण्यात आलेल्या आहेत या अत्याधुनिक बस स्थानकामुळे नाशिकच्या लौकिका मध्ये वाढ होईल यात मुळीच शंका नाही.