नासिक मध्ये NEET घोटाळ्याच्या सखोल चौकशीच्या मागणीसाठी AISF चे आंदोलन.
नाशिक प्रतिनिधी

नाशिक – देशभरात वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल ४ जून रोजी जाहीर झाला . हा निकाल जाहीर झाल्यानंतर देशातील तब्बल एक नव्हे दोन नव्हे तर 37 विद्यार्थ्यांना 720 पैकी 729 गुण मिळाले आहेत यंदा देशात 24 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी पाच लाख 47 हजार 36 विद्यार्थी आणि सात लाख 69 हजार 222 विद्यार्थीनी वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत .यातील खुल्या गटातून तीन लाख तेहतीस हजार 932 , ओबीसीतून सहा लाख 18 हजार 890 , एस सी तून एक लाख 78 हजार 738 , एसटीतून 68 हजार 779 आणि डब्ल्यू एस मधून एक लाख 16 हजार 229 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. देशातील वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या शासकीय आणि खाजगी अशा एकूण 549 महाविद्यालयाच्या 78 हजार 33च जागांसाठी प्रवेश दिला जातो, मात्र परीक्षेत झालेल्या गैरप्रकारामुळे उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न भंगले आहे यावर NTA ला प्रश्न विचारले असता NTA ने जे स्पष्टीकरण केले ते समाधानकारक नाही. नीट परीक्षेच्या वेळी प्रश्नपत्रिका कुठल्याच आरोप झाला, परंतु NTA ने तेव्हा देखील नकार दिला होता. या सगळ्या घटना तसेच त्याबद्दल एन टी ए मार्फत दिल्या गेलेल्या माहितीत मोठ्या प्रमाणात असलेली विसंगती बघता यासंबंधी एनटीए द्वारा एक मोठा घोटाळा झाला असल्याचा संशय घेण्याची पुरेसे पुरावे आहेत. नीट परीक्षेच्या सुरुवातीच्या टप्प्यातच ए आय एस एफ ने स्पष्टपणे सांगितले होते की असे केंद्रीकृत मॉडेल विद्यार्थ्यांचे भविष्य अडचणीत आणल्याशिवाय राहणार नाही, शिक्षणाच्या केंद्रीय कारणामुळे संस्थाची स्वायत्तता संपुष्टात आली आहे .आणि खाजगी कोचिंग क्लासेस वाढली आहे. NEET UG ने विविधतेला नकार दिल्याने खाजगी कोचिंग सम्राटांच्या नफ्यात वाढ होण्यास मदत झाली आहे .एआयएसएफ (ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन) नीट पूर्णपणे रद्द करण्याची मागणी करत आहे. त्यामुळे पालकावर पडत असलेला आर्थिक दबाव देखील गंभीर चिंतेची बाब आहे .आय ए एस एफ ने सध्याच्या घोटाळ्याची त्वरित चौकशी करण्याची आणि विद्यार्थी आणि त्याच्या कुटुंबीयांच्या चिंता दूर करण्याची मागणी केली आहे. संस्थात्मक चुका दुरुस्त करून नीट परीक्षेलाच बरखास्त करणे आवश्यक आहे .विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली पाहिजेत अशी ए आय एस एफ ची मागणी आहे. या आंदोलनावेळी राज्याध्यक्ष काँ विराज देवांग, राज्यसहसचिव प्राजक्ता कापडणे ,शहराध्यक्ष कैवल्या चंद्रात्रे ,राज्य कौन्सिल सदस्य तल्हा शेख, लक्षिता देवांग ,प्रणव काथवटे ,अंकित यादव ,ओम हिरे, साक्षी लोखंडे ,राहुल भुजबळ, रोहित काथवटे ,रोहित खारोडे, विनायक संत, तन्मय देवरे ,देविका शिंदे ,इतर विद्यार्थी उपस्थित होते.