सिन्नर तालुक्यातील खळबळजनक घटनेने सिन्नर हादरले पिडितेवर बलात्कार ……….
सिन्नर प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे धर्मांतर करून बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सिन्नर – नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे धर्मपरिवर्तनाच्या नावाखाली बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
ख्रिश्चन या धर्मांतरण प्रकरणातील आरोपी त्याच्या चार साथीदारांसह झोपडपट्ट्यांमध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रसार करीत असे. झोपडपट्टी भागातील रहिवाशांना निरनिराळ्या प्रकारची आमिषे या आरोपींकडून दाखवण्यात येत होती., इतकेच काय तर आरोपी सर्व आजार हे येशूच्या नावाने बरे होतात असा खोटा प्रचारही करीत होता. येशूची प्रार्थना केल्यानं आर्थिक आणि आरोग्य समस्या दूर होतात, त्यामुळे येशूची पूजा करा, असं या आरोपींकडून सांगण्यात येत असे. हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासही लोकांना सांगण्यात येत असे.या संदर्भात सविस्तर गोष्ट अशी की सिन्नर येथील दावत मळा माळेगाव येथे संबंधित फिर्यादी महिला आपला उदरनिर्वाह मोलमजुरी करून भागवते.
पीडित महिला मुसळगाव एमआयडीसीमध्ये काम शोधण्यासाठी घरून निघाले, दुपारचे सुमारास दाबी देस सिन्नर येथे आल्यानंतर रिक्षाची वाट पाहत थांबले असताना तेथे दोन महीला भेटल्या व त्या पीडित महिलेस म्हणाल्या की तु आमचे सोबत चल आम्ही तुला काम देतो, त्यानंतर परी हनुमान मंदीर, जोशीवाडी सिन्नर येथे पायी त्याचे सोबत घेउन गेल्या. घरी पोहचल्यानंतर त्यांनी त्यांची नावे बुटटी व प्रेरणा अशी असल्याचे सांगीतले. घरात भाउसाहेब उर्फ भावड्या दोडके हा देखिल होता. त्यांनी पिडीतेस तिचा विषयीची माहीती विचारली व त्या म्हणाल्या की बाई तुझी तब्बेत बरी राहत नाही तर तुला आम्ही सांगतो ते कर ‘तु येशु ची प्रार्थना कर’ तुला बरेपण वाटेल, तुझी आर्थिक परीस्थीती सुधारेल. त्यानंतर त्यांनी सांयकाळी घरी राहुल फादर यांना बोलाउन घेतले. राहुल फादर आल्यावर त्यांनी पीडित महिलेस लाल रंगाचे पाणी पाजले. एक येशुचे चित्र असलेले आधार पुस्तक दाखविले. त्यानंतर पीडित महिलेला थोडे गुंगी आल्या सारखे वाटल्याने पीडित तेथेच त्यांचे घरी झोपीवले. त्या रात्री फादर सह इतर ४ जणांनी दमदाटी करून आळीपाळीने पीडितेवर बळजबरीने शरीरसंबंध केला.
यासंदर्भात सिन्नर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 323, 328,344, 376 डी, 504, 506,34,76(1) या कलम अंतर्गत पाच आरोपींविरुद्ध कारवाही करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत