जैन प्राथमिक शिक्षण मंदिरचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न !
प्रतिनिधी ज्ञानेश्वर भवर

लासलगाव ता.निफाड दि.24/01/2023
श्री महावीर जैन विद्यालय,लासलगाव संचलित वर्धमान बालक मंदिर व जैन प्राथमिक शिक्षण मंदिर यांचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे उदघाटन उमराणा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांतजी देवरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुंबई येथील प्रसिद्ध डॉ.प्रविणजी छाजेड यांनी भूषविले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मनमाड येथील लायन्स क्लबचे सेक्रेटरी सी.ए. सागरजी बरड़िया, लासलगावचे तलाठी नितीनजी केदार साहेब ,प्रसिद्ध व्यापारी पंकजजी आब्बड, प्रमोदजी भुतडा, सामाजिक कार्यकर्ते रविंद्रजी पाटील, प्रसिद्ध डॉ.भिकचंदजी जांगडा,डॉ.सुनिताजी छाजेड ,निफाड अर्बन बँकेच्या संचालिका सौ. वैशालीजी दुधेडिया, निमगाव वाकडाच्या सरपंच सौ. पूजाजी दरेकर, ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालय, पाचोरेच्या मुख्याध्यापिका सौ. अनिताजी पगार, सामाजिक कार्यकर्ते दिगंबरजी दरेकर, ग्रामपालिका सदस्या सौ.अनिता ब्रम्हेचा, माजी ग्रामपालिका सदस्या स्नेहल ब्रम्हेचा, तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष जवाहरलालजी ब्रम्हेचा, मानद सचिव शांतीलालजी जैन, श्री महावीर विद्यालयाचे अध्यक्ष सुनिलजी आब्बड, जैन प्राथमिक शिक्षण मंदीरचे अध्यक्ष महावीरजी चोपडा, श्री महावीर औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष मोहनशेठजी बरडिया, संस्थेचे संचालक अजयजी ब्रम्हेचा, अमितजी जैन व कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अक्षयजी आब्बड , संतोषजी ब्रम्हेचा, राहुलजी बरडिया, डॉ. सुनीलजी जांगडा आणि जैन प्राथमिक शिक्षण मंदिरच्या मुख्याध्यापिका नलिनी शिंदे, श्री महावीर विद्यालयाच्या प्राचार्या पल्लवी चव्हाणके, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य शिरसाठ सर, आय.टी.आय.चे प्राचार्य साहेबराव हांडगे, आदी उपस्थित होते. प्रमुख अतिथींच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यालयाचे संगीतशिक्षक सचिन आहेर सर व गीत मंचाने स्वागतगीत सादर केले. या कार्यक्रमाचे प्रास्तविक उपशिक्षिका लिनीता अहिरे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रशांतजी देवरे यांनी प्राथमिक शिक्षण हा शिक्षणाचा मूळ पाया आहे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षणाचा पाया पक्का करण्यावर भर देण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घेऊन प्रगती करावी असे प्रतिपादन केले. तसेच डॉ. प्रविणजी छाजेड यांनी विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पंकजजी आब्बड ,सागरजी बरडिया, जवाहरलालजी ब्रम्हेचा ,महावीरजी चोपडा यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला व वार्षिक स्नेहसंमेलनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी रवींद्रजी पाटील यांनी संस्थेस गुणवंत विद्यार्थ्यांच्या बक्षिसांसाठी 21000 रुपये ठेव रक्कम व प्रशांत देवरे यांनी 5000 रुपये ठेव रक्कम म्हणून दिली.
नर्सरी ते इ.4 थी च्या विद्यार्थ्यांनी आपले विविध कलाविष्कार सादर केले. यात समूह नृत्य, वैयक्तिक नृत्य, गायन, सोशल मीडिया व शैक्षणिक विषय यावर आधारित नाटिका ,फॅन्सी ड्रेस या कार्यक्रमांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी देवा श्री गणेशा ,तेरी मिट्टी, इंडिया वाले इत्यादी विविध गाण्यांवर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक महेश खैरनार ,उपशिक्षिका श्रीमती जयश्री बाविस्कर ,श्रीमती पल्लवी दवते यांनी केले. तर आभार प्रदर्शन उपशिक्षक नवनाथ ठाकरे यांनी केले. या कार्यक्रमास सर्व विद्यार्थी, पालकवर्ग व संस्थेतील सर्व शाखांचे शिक्षक- शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.