ताज्या घडामोडी
शहरात नोकरी करून स्वतःचा पगार गावातील गरजू कामगारांना वाटला: गावातील नागरिकांनी केले कौतुक.
उपसंपादक:- रेणुका पगारे

उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील प्रसिद्ध व्यापारी राजेंद्र लोंढे यांचे चिरंजीव कु.सौदागर राजेंद्र लोंढे यांना .पुणे येथील बजाज कंपनीमध्ये कॉम्प्युटर इंजिनियर म्हणून नोकरी लागल्यानंतर.समाजामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगणाऱ्या व वडिलांच्या सानिध्यात कष्ट करणाऱ्या लोकांना देव मानवत.स्वतःचा पहिल्या महिन्यातील एक लाख रुपये पगार ३८कामगारांना प्रत्येकी २२०० रुपये वाटून.त्यांची दिवाळी गोड करून समाजामध्ये एक आदर्श निर्माण करून दिल्याबद्दल गावातील नागरिकांनी सौदागर लोंढे यांचे कौतुक केले.