ताज्या घडामोडी

विद्यानगर अंगणवाडी येथे गरोदर मातेचा कौतुक सोहळा

लासलगाव- विद्यानगर अंगणवाडी अनुक्रमांक 383 गरोदर मातांचा कौतुक सोहळा अंगणवाडीत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय पिंगटे मॅडम सामाजिक कर्याकर्त्या फरीदा काझी मॅडम(भाभी) सुरेखा पवार ताई व इतर सर्व महिला उपस्थित होत्या अंगणवाडी कार्यकारणी सौ जयश्री किरण बोराडे अंगणवाडी मदतनीस सौ मंदाकिनी नंदकुमार निकम होत्या गरोदर मातेला माहिती सांगितली व इतर महिलांना पण गरोदर मातेचे चौरस आहार घेतला पाहिजे त्यात वरण-भात अंडी असे आहार घेतले पाहिजे गरोदर मातेंचा वजन दर महिन्याला एक ते दीड किलो नि वाढले पाहिजे नऊ महिन्यापर्यंत दहा ते बारा किलो वजन गरोदर मातेचा वाढला पाहिजे गरोदर मातेचा एच बी तेरा पर्यंत पाहिजे टी टी चे दोन डोस घेतले पाहिजे गरोदर मातेला रात्री आठ तास दुपारी दोन तास आराम केला पाहिजे जेवणामध्ये सकसआहार फळ पालेभाज्या इतर चा समावेश असावे दुग्धजन्य पदार्थ कडधान्य मोड आलेले खावे, जेवणात आयोडीन युक्त मिठाचा वापर केला पाहिजे गरोदर मातेने वजनात बालक जन्मात आल्यावर लगेच स्तनपान करावे पहिल्या चिकाचे दूध पाजल्याने बाळाची रोगप्रतिकार शक्ती वाढते जन्मताच बाळाचे वजन तीन ते सव्वा तीन किलो एवढे पाहिजे जर त्याच्यापेक्षा कमी असलं तर तो बाळ कुपोषित म्हटले जातो आणि लगेच त्वरित त्याचा उपचार करावा अशी सगळी माहिती माननीय पिंट्या मॅडम व फरीदा काझी मॅडम यांनी दिली तसंच टाकळी विंचूर अंगणवाडीत चाळीस वर्षे कार्यरत येवले मॅडमचा निरोप समारंभ त्यांना खूप सारे शुभेच्छा आशीर्वाद देऊन त्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला त्यांना कामाची आवड असल्यामुळे त्या म्हटल्या आता मी ज्येष्ठ झाली तर लगेच आपले काझी मॅडम यांनी सांगितले तुम्हाला जरी कामाची आवड असली तरी आपले ज्येष्ठ नागरिक हॉल जे आपले लासलगाव ग्रामपंचायत तर्फे माननीय सरपंच साहेब यांनी जेष्ठ नागरिकांसाठी खूप मस्त हॉल बांधलेला आहे तुम्ही तिथे जाऊन आपले स्वतःचे मन रमू शकता दोन तास तिथे जाऊन तुम्ही बसू शकता व तुमची ऍक्टिव्हिटी तिथे पण चालू राहील लासलगाव ग्रामपंचायत व सरपंच साहेबांचे केलेले कार्या चि माहिती देत होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बोराडे मॅडम यांनी केले व निकम मॅडम यांनी आभार मानले

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.