
लासलगाव-नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लासलगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना (+2 स्तर) च्या वतीने जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा उपरुग्णालय निफाड समुपदेशक नितीन परदेशी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यांनी एड्स या आजाराविषयी कशी काळजी घ्यावी, तसेच या आजाराबद्दल माहिती सांगितली. एड्स आजाराबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात असलेल्या शंकांचे निरसन केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, प्राचार्य डॉ.दिनेश नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी निफाड उपजिल्हा रुग्णालय, प्रशांत जाधव, C.H.O. निमगाव वाकडा, ग्रामीण रुग्णालय लासलगाव L.W., ज्योती कोटकर ,आरोग्य सेवक दर्शन परदेशी, उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक प्रा.उज्वल शेलार, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.देवेंद्र भांडे, प्रा.सुनिल गायकर, प्रा.जितेंद्र देवरे, प्रा.रामनाथ कदम, प्रा.शरद सोनवणे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.