
नाशिक – सिन्नर येथे आदिवासी उत्सव समितीच्या वतीने जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.त्यानिमित्त पायी रॅली , प्रबोधन सभा, आदीसह विविध कार्यक्रम झाले. खासदार राजाभाऊ वाजे, सह्याद्री युवा मंचचे संस्थापक/ अध्यक्ष – उदय भाऊ सांगळे, साहित्यिक विजयकुमार कर्डक यांची प्रमुख उपस्थिती होती. जागतिक आदिवासी दिनानिमित्त हुतात्मा स्मारकापासून पायी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच बस स्थानका जवळील महात्मा ज्योतिबा फुले पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, वावी वेस येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, त्रिशूल नगर मापरवाडी रोड व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह समोरून रॅली काढण्यात आली. यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते .आदिवासी नृत्य व कलापथका चा कार्यक्रम करण्यात आला. यात असंख्य आदिवासी बांधवांनी आपल्या कला व नृत्य सादर केले. ही रॅली दुपारी 12 पासून सायंकाळी चार पर्यंत काढण्यात आली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह येथे प्रबोधन सभा दुपारी चार वाजता घेण्यात आली. आदिवासी बांधवांनी सिन्नर येथे कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने हजर राहून कार्यक्रमाची शोभा वाढविले.