हातकणंगले तालुका काँग्रेस कमिटीच्या विविध सेलमध्ये नवीन पदाधिकाऱ्यांची निवडी,करण्यात आल्या.

हातकणंगले तालुका काँग्रेस कमिटीच्या विविध सेलमध्ये नवीन पदाधिकाऱ्यांची निवडी,करण्यात आल्या.
इम्रान कासिम पटेल (रा. मौजे वडगाव) यांना हातकणगले तालुका ओबीसी संघटनेचे उपाध्यक्षपद तर मैणुद्दीन अल्लाउद्दीन मौला हातकणगले तालुका ओबीसी उपाध्यक्षपद, सनी मनोहर शिंदे (रा.शिरोली ) यांची हातकणगले तालुका अनुसूचित जाती समिती, उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. महेंद्र नरसिंह कांबरे यांची तालुका अनुसूचित जाती सेलच्या सरचिटणीस पदी नियुक्त करण्यात आले.
नवीन पदाधिकाऱ्यांना काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे राबत महाविकास आघाडीच्या विजयासाठी प्रयत्न करावे असे आवाहन आमदार राजूबाबा आवळे यांनी केले.
यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष भगवानराव जाधव, बाजीराव सातपुते, शशिकांत खवरे , उत्तम पाटील , डॉ. विजय गोरड, शकील आत्तार, सदानंद महापुरे, धनाजी तिवडे, सुरेश नाईक, सरदार मुल्ला, रोहित खवरे, काशिनाथ कांबळे, अन्सार देसाई , सचिन पुजारी , संतोष लोंढे, जमीर मुल्ला, अतुल शिंदे, श्रीकांत मोहिते , सचिन बडेकर विक्रांत डावरे, रमाबाई शिंदे, लताताई शिंदे, बशीर हजारे आदी उपस्थित होते.