रुकडीत काकासाहेब माने हायस्कूल मध्ये ‘चला बचत करूया ‘ व्याख्यान

रुकडी- काकासाहेब माने हायस्कूल मध्ये ‘चला बचत करूया ‘ व्याख्यान
“विद्यार्थी दशेतच पैश्याबरोबरच पाणी,वीज,इंधन,ऊर्जा बचतीची सवय लावून घेतली पाहिजे.कुटुंबातील सदस्यांचे प्रबोधन केले पाहिजे.तरच आपण स्वतःचा,कुटुंबाचाआणि देशाच्या विकासात हातभार लावू शकू” ,असे प्रतिपादन बँकिंग क्षेत्रातील वक्ते श्री पुंडलिक पोळ यांनी केले.
रुकडीतील काकासाहेब माने हायस्कूलमध्ये शासकीय उपक्रमाअंतर्गत “चला बचत करूया” या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते यावेळी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती निमित्त पुंडलिक पोळ यांचे हस्ते प्रतिमा पूजन झाले .यावेळी अध्यक्ष स्यानी मुख्याध्यापिका सौ.पदमजा पाटील होत्या. अनावश्यक खर्च टाळून पैशाची बचत कशी करावयाची.वीज,पाणी,इंधन,ऊर्जा यांचा अपव्यय टाळून संवर्धन कसे करता येते याविषयी सविस्तर माहिती श्री पोळ यांनी दिली यावेळी विध्यार्थी व शिक्षकानी भाषणे केली. कार्यक्रमास शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते संजय वारके यांनी आभार a सूत्रसंचालन केले.