
लासलगाव – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे बहि:शाल शिक्षण मंडळ व नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लासलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प प्राचार्य डॉ.पी.व्ही.रसाळ यांनी ‘व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर गुंफले. त्यांनी त्यांच्या व्याख्यानात दैनंदिन जीवनात व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्व विशद केले. दुसरे पुष्प प्रा.राजाराम मुंगसे यांनी ‘रसास्वाद’ या विषयावर गुंफले. त्यांनी त्यांच्या व्याख्यानातून व्यक्तीच्या दैनंदिन जीवनात साहित्यातील नऊ रसाचे महत्त्व विषद केले. तिसरे पुष्प डॉ.सुषमा दुगड यांनी ‘हास्ययोग’ या विषयावर गुंफले. त्यांनी त्यांच्या व्याख्यानातून आजच्या धकाधकीच्या जीवनात ताण-तणाव मुक्त जीवन कसे जगावे यावर मार्गदर्शन केले.
सदर व्याख्यानमाला यशस्वी होण्यासाठी नूतन विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे जनरल सेक्रेटरी मा.श्री.गोविंदरावजी होळकर, प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे, उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे आणि उपप्राचार्य डॉ.सोमनाथ आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली व्याख्यानमालेचे संयोजन केंद्रवाह डॉ.राजेश शंभरकर यांनी परिश्रम घेतले. महाविद्यालयातील डॉ.प्रणव खोचे, प्रा.मिलिंद साळुंके, प्रा.अमोल पुंड, प्रा.हर्षल कदम, प्रा.किशोर अनकुळनेकर, प्रा.परशराम पानसरे व प्रा.वाल्मीक आरोटे या प्राध्यापकांनी व्याख्यानमाला यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. या व्याख्यानमालेला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थीत होते.