राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ राष्ट्रीय अध्यक्ष संतोष जी निकम यांच्या आदेशाने व राष्ट्रीय सचिव रमेश देसाई महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापुर जिल्हा कार्यालयात पश्चिम महाराष्ट्र पत्रकार संघ आढावा बैठक घेण्यात आली.
सोमनाथ मानकर

अध्यक्षस्थानी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे महाराष्ट्राचे सहसंपर्कप्रमुख सोमनाथ मानकर सप्तशृंगी गड नाशिक हे होते. यावेळी 2024 वर्षात पत्रकार संघाची ध्येय, धोरण व उद्दिष्टे याबाबत चर्चा करण्यात आली. पत्रकारांवर होणारे हल्ले, पत्रकारांवर दाखल होणारे खोटे गुन्हे रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली. राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे बहुउद्देशीय 54 विंग्स असून यामध्ये कशा पद्धतीने काम चालते व याचा इतर लोकांना आपण कशाप्रकारे फायदा करून देऊ शकू या संदर्भात सोमनाथ मानकर यांनी माहीती दिली. बैठकीसाठी कोल्हापूर जिल्ह्याचे कामगार अध्यक्ष व पत्रकार रेणूताई पोवार राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुकुमार वांजुळे कवठेमंकाळ तालुका अध्यक्ष अप्पासाहेब केंगार सांगली जिल्हा अध्यक्ष इरफान केडिया सांगली जिल्हाउपाध्यक्ष हाजीलाल गोटे वाले आदी उपस्थित होते. राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख सोमनाथ मानकर यांचा कोल्हापूर ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . सोमनाथ मानकर यांनी सपत्नीक कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराचे दर्शन घेतले. त्यांच्या सोबत कामगार आघाडी जिल्हा अध्यक्ष, महिला जिल्हा अध्यक्ष
रेणुताई पोवार, उपाध्यक्ष
सौ सोनाली जामदार,
श्री प्रशांत जामदार, अर्जुन पोवार आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
.