ताज्या घडामोडी
चोकाक येथे 2022/2023 दलीत वस्ती सुधार योजना मधून विकास कामांचा शुभारंभ

चोकाक – हातकणंगले तालुक्यातील चोकाक येथील वार्ड क्रमांक 4 मधील दलीत वस्ती सुधार योजना मधून आज दिनांक 30/12/2023रोजी गटर बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला लोकप्रिय खासदार धैर्यशील माने यांच्या फंडातून दलीत वस्ती सुधार योजनेअंतर्गत 9 लाख रुपये इतका निधी यातून या कामाची सुरुवात केली तसेच शिवसेना उप जिल्हाप्रमुख डॉ अविनाश बनगे यांच्या विशेष सहकार्यातून ह्या कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी उपस्थित सरपंच सुनिल चोकाककर, उप सरपंच अरुण व्हनाळे , ग्रामपंचायत सदस्या सौ सविता चव्हाण,सदस्य हार्षदकुमार कांबळे, सदस्य प्रसाद भोपळे, सदस्य प्रवीण माळी,अभिजित माळगे आखिल चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.