विटा पालिकेचा मिळकत व्यवस्थापक 25 हजाराची लाच घेताना जाळ्यात सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

विटा – नगरपालिकेतून निवृत्त झालेल्या कडून देय रकमेचा धनादेश काढण्यासाठी त्यांच्याकडून 25, हजाराची लाच घेताना मिळकत व्यवस्थापकाला रंगेहात पकडण्यात आले बुधवारी दुपारी सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक संदीप पाटील यांनी दिली पुंडलिक हिरामण चव्हाण, वय 49, राहणार साळशिंगी रोड विटा मूळ राहणार मोहनदरे जि नाशिक असे अटक केलेल्याचे नाव आहे पुंडलिक चव्हाण हा विटा नगरपालिकेत मिळकत व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे तक्रारदार व्यक्तीचे वडील विटा पालिकेत कार्यरत होते त्यांचे दोन महिन्यापूर्वी निधन झाले होते त्यांच्या सेवा कालावधीत मिळणाऱ्या शासकीय दे य रकमेचा धनादेश काढण्यासाठी चव्हाण याने त्यांच्याकडे 25 हजार रुपये लाचेची मागणी केली मात्र तक्रारदारांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी याबाबत दिनांक 20 डिसेंबर रोजी चव्हाण यांच्या विरोधात सांगलीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती विभागाने याची पडताळणी केल्यानंतर चव्हाण यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर बुधवारी दुपारी तक्रारदाराकडून 25 हजाराची लाच घेताना चव्हाण याला रंगेहात पकडण्यात आले त्याच्या विरोधात विटा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे शासकीय निमशासकीय लोकसेवकांनी लाच मागितल्यास, 98 २१ ८८ ०७ ३७ या मोबाईल क्रमांकावर थेट माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन उपाधीक्षक पाटील यांनी केले आहे लाचलुतपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विनायक भिलारे दत्तात्रय पुजारी धनंजय खाडे अजित पाटील सलीम मकानदार रामहरी वाघमोडे ऋषिकेश बडणीकर उमेश जाधव सुदर्शन पाटील सीमा माने आदींच्या पथकाने ही कारवाई केली