ताज्या घडामोडी
राजारामपुरी चे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे विशेष पुरस्काराने सन्मानित

शहरातील राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे यांच्यासह त्यांच्या गुन्हे शोध पथकाने गेल्या महिन्यात कोंम्बिंग ऑपरेशन वेळी मोठ्या प्रमाणात घातक शस्त्रे जत केल्याबद्दल पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या हस्ते निरीक्षक तनपुरे यांचा विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात आला निरीक्षक तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने नोव्हेंबर महिन्यात राजेंद्र नगर जवाहर नगर सुभाष नगर आदी भागात कोम्बिंग ऑपरेशन करून एडका तलवारी चाकू कोयता अशी, 19, धार धार शस्त्रे जप्त केली होती त्यांच्या या कार्याची दखल घेऊन कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी निरीक्षक तनपुरे यांचा विशेष पुरस्कार देऊन सन्मान केला त्यामुळे राजारामपुरी पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे,