लासलगाव प्रहार संघटने कडून बच्चू भाऊ कडु यांचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा
मुख्य संपादक राहुल वैराळ

लासलगाव येथील प्रहार दिव्यांग संघटने तर्फे शहर अध्यक्ष अनिल भावसार यांच्या अध्यक्षतेखाली बच्चू कडू यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला आज सकाळी उगाव येथील हिंगलाज नगर(खेडे) येथील शांतिगिरी महाराज यांचे जगतगुरू जनार्दन स्वामी महाराज गुरुकुल येथे जाऊन वाढदिवस साजरा करण्यात आला.
लासलगाव पंचक्रोशीतील दिव्यांग बंधू मनोज परेराव/अविनाश देसाई यांनी पालखीचे पूजन केले शहर अध्यक्ष अनिल भावसार यांनी गुरुकुल चे स्वामी कमलगिरीजी म्हाइज यांना शाल श्रीफळ देऊन स्वामींचा सत्कार करण्यात आला गुरुकुल मधील एक अनाथ मुलाच्या हस्ते केक कापून बच्चू भाऊंचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यानंतर 100 अनाथ मुलांना बच्चू भाऊंचे छायाचित्र प्रिंट केलेले शालेय पॅड दिव्यांग बंधूंच्या हस्ते वाटप करण्यात आले.
गुरुकुल तर्फे सानप सरांनी सर्व दिव्यांगाचे शाल व श्रीफळ देऊन आभार मानले.
यावेळी गुरुकुल मधील विद्यार्थी,कमलगिरीजी महाराज,सानप सर,प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे लासलगाव शहर अध्यक्ष अनिल भावसार,मनोज परेराव,भुपेंद्र जैन,राजू सुरसे,ओंकार शिंदे,चंद्रशेखर शिंदे,चंद्रकांत भावसार,अविनाश देसाई,आण्णा रायते,किरण देसाई,संतोष भुजबळ,वामन भवर,पापा शेख, गोकुळ मोरे,जयवंत राजगुरू आदी दिव्यांग बांधव उपस्थित होते.