लासलगाव महाविद्यालयात विद्यार्थ्यांना अँटी रॅगिंग संदर्भात मार्गदर्शन
मुख्य संपादक राहुल वैराळ

लासलगाव येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये निफाड तालुका विधी सेवा समिती, वकील संघ आणि विद्यार्थी विकास मंडळ, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लासलगाव यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित विधी साक्षरता शिबीर प्रसंगी विद्यार्थ्यांना रॅगिंग संदर्भात असलेल्या कायदेशीर बाबी, वाहतुकीचे नियम, विद्यार्थ्यांनी विद्यार्थी जीवनामध्ये कोणत्या नियमांचे पालन केले पाहिजे याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन निफाड तालुका विधी सेवा समिती आणि वकील संघाच्या वतीने करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निफाड वकील संघाचे अध्यक्ष ॲड.श्री.प्रवीण नामदेवराव ठाकरे सर होते. निफाड वकील संघाचे सचिव ॲड.श्री.आर.बी.शिंदे यांनी अध्यक्षीय सूचना केली त्यास निफाड वकील संघाच्या सदस्या ॲड.सौ.वैशाली मोरे यांनी अनुमोदन दिले तसेच याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक न्यायाधीश श्री.बी.डी.पवार सर (अतिरिक्त सत्र न्यायाधीश, निफाड) यांनी विद्यार्थ्यांना ‘निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट व बँकिंग विषयक कायदे’ याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच मुंबई मंत्रालयातील विधी व न्याय विभागाचे सहसचिव श्री.विलास वसंतराव गायकवाड सर यांनी विद्यार्थ्यांना ‘रॅगिंग प्रतिबंधक कायदा’ याविषयी मार्गदर्शन केले तर नासिक जिल्हा वकील फेडरेशनचे अध्यक्ष ॲड.श्री.इंद्रभान रायते सर यांनी ‘महिलांविषयी कायदे’ या विषयावर मार्गदर्शन केले आणि निफाडचे वरिष्ठ स्तर सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती ए.एल.सराफ मॅडम यांनी ‘बालविवाह प्रतिबंधक कायदा’ याविषयी मार्गदर्शन केले तर जेष्ठ विधीज्ञ ॲड.श्री मधुकर व्यवहारे सर यांनी ‘बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि पोक्सो ॲक्ट’ या विषयी मार्गदर्शन केले तर ॲड.कु.समीक्षा पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना ‘सायबर सिक्युरिटी’ या विषयावर मार्गदर्शन केले. अशाप्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रातील विधीज्ञ यांनी महाविद्यालयात घेण्यात आलेल्या” विधी साक्षरता शिबीरामध्ये” विद्यार्थ्यांना विविध उदाहरणांच्या आधारे कायदेविषयक सखोल मार्गदर्शन केले.
याप्रसंगी नूतन विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे चेअरमन श्री.संजय बापू होळकर, संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदरावजी होळकर, खजिनदार श्री.अनिल डागा, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य श्री.प्रकाश पाटील, श्री.चंद्रशेखर भावसार, श्री.हसमुखभाई पटेल, श्री.जगदीश होळकर, श्री.चंद्रशेखर होळकर, श्री.सचिन मालपाणी, श्री.योगेश पाटील, ॲड.संदीप होळकर, श्री.दिलीप अब्बड तसेच प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अश्विनी पवार यांनी केले तर प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांनी केले तसेच याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयातील रा.से.यो.च्या विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले तर आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली, कु.शुभम इंगळे या विद्यार्थ्याने पसायदान सादर केले.