लासलगाव महाविद्यालयात Viksit Bharat@2047 : Vioce of Youth उपक्रमाचे आयोजन
मुख्य संपादक राहुल वैराळ

लासलगाव ( ) येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य डॉ आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने Viksit Bharat@2047 : Vioce of Youth या उपक्रमाच आयोजन करण्यात आले. माननीय पंतप्रधान यांच्या उपस्थितीत दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता वेब लिंक द्वारे या उपक्रमाच प्रसारण विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले याप्रसंगी 200 विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे, उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे आणि उपप्राचार्य डॉ.सोमनाथ आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी श्री.सुनिल गायकर, श्री.देवेंद्र भांडे, प्रा.मारुती कंधारे आणि रासेयो स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.