माले येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन सोहळा संपन्न

माले:- हातकणंगले तालुक्यातील माले येथे वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी हातकणंगले तालुक्यातील व इचलकरंजी शाखेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी उपस्थित माले गावचे सरपंच राहुल कुंभार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते वंचित बहुजन म्हणजे काय तर वंचित म्हणजे जो आजपर्यंत अनेक घटकांपासून वंचित असणारा वर्ग तसेच बहुजन म्हणजे सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन जाणारा पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी होय तसेच उपसरपंच बंटी पाटील यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले तसेच तालुका अध्यक्ष अशपाक देसाई यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना बोलले की सर्वांना एका माळेमध्ये गुंफण्याचे काम हे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे करत आहेत त्यांच्या कार्याला हातभार लावण्याचे काम आम्ही सर्वांनी मिळून करूया असे ही ते बोलत होते पक्षाला बळकटी देण्यासाठी आपण आपल्या परीने प्रयत्न करत राहूया असे हे ते बोलत होते, तसेच. माजी सरपंच भिकाजी सकटे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले की वंचित म्हणजे निवळ दोन समाज बांधव नव्हे तर वंचित बहुजन म्हणजे सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र आणण्याचा विचार करणारा पक्ष आहे निव्वळ मातंग व बौध्द समाजाचा नाही हा सर्वांना एकत्र येऊन जाणार पक्ष आहे, येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या पक्ष वाढीसाठी प्रयत्न करत राहूया असे ही ते बोलत होते यावेळी हातकणंगले तालुका महासचिव जनार्दन गायकवाड, यांनी देखील, मनोगत व्यक्त केले,उपस्थित सर्व मान्यवरांनी आपली मते मांडली याप्रसंगी उपस्थित मान्यवर , वासंती मेहतर जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी, वैशाली कांबळे इचलकरंजी शहर अध्यक्षा, जनार्दन गायकवाड महासचिव तालुका, अशपाक देसाई प्रमोद कदम, उपसरपंच हातकणंगले तालुका अध्यक्ष, नितीन कांबळे शाखा अध्यक्ष, प्रमोद कांबळे शाखा उपाध्यक्ष, वैभव सकटे कोषाध्यक्ष शाखा, विशाल कांबळे महासचिव शाखा, श्री सकटे सचिव, प्रीतम कांबळे खाजनिस, विजय कांबळे संघटक, संतोष घाटगे संघटक, विजय सावंत, राहुल कुंभार सरपंच, प्रताप पाटील उपसरंच , राहुल कांबळे ग्रामपंचायत सदस्य , अभयसिंह पाटील सोसायटी चेअरमन माले, अक्काताई कांबळे ग्रामपंचायत सदस्य, मीना कांबळे ग्रामपंचायत सदस्य, स्वाती डफळे ग्रामपंचायत सदस्य, जयश्री नरुटे ग्रामपंचायत सदस्य, महेश कांबळे युवा अध्यक्ष इचलकरंजी शहर, यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.