ताज्या घडामोडी

बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत के. पी. च ठरले भारी

कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना लिमिटेड बिद्रीच्या पंचवार्षिक निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष के. पी. पाटील यांच्या सत्ताधारी पॅनेलने सर्वच्या सर्व 25 जागा जिंकत आपणच लय भारी असल्याचे सिद्ध केले आहे. आमदार प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनेलला पराभव पत्करावा लागला आहे. बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार दिनकरराव जाधव, माजी आमदार बजरंग देसाई, माजी आमदार संजय घाटगे, गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी पॅनेल तर उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजय मंडलिक, खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार अमल महाडिक, समरजीत घाटगे, ए. वाय. पाटील यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनेल रिंगणात होते. गेले पंधरा दिवस कारखान्याचे कार्यक्षेत्र असलेल्या भुदरगड, कागल, राधानगरी व करवीर तालुक्यात प्रचाराचा मोठा धुराळा उडाला होता. रविवारी कारखान्यासाठी चुरशीने 89% मतदान झाले साऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकीचा निकाल हाती आला असून यामध्ये सत्ताधारी गटाने सरासरी 5500 ते 6500 मताधिक्याने सर्व 25 जागा जिंकले आहेत.

उमेदवार निहाय मतदान पुढील प्रमाणे….

सत्ताधारी गट….

उत्पादक गट क्रमांक एक राधानगरी :

राजेंद्र पाटील : 27235

राजेंद्र भाटळे : 26823

राजेंद्र मोरे : 27767

उत्पादक गट क्रमांक दोन राधानगरी :

दीपक किल्लेदार : 26876

दत्तात्रेय पाटील : 26619

उमेश भोईटे : 27884

उत्पादक गट क्रमांक तीन कागल :

गणपतराव फराकटे : 27267

रणजीत मुडुकशिवले : 25999

सुनीलराव सूर्यवंशी : 27126

उत्पादक गट क्रमांक चार कागल :

प्रवीणसिंह पाटील : 28552

रवींद्र पाटील : 27438

रंगराव पाटील : 27341

उत्पादक गट क्रमांक पाच भुदरगड :

पंडितराव केणे : 26942

मधुकर देसाई : 27127

राहुल देसाई : 27489

के. पी. पाटील : 28693

उत्पादक गट क्रमांक सहा भुदरगड :

सत्यजित जाधव : 29101

धनाजीराव देसाई : 27845

केरबा पाटील : 26995

उत्पादक गट क्रमांक सात करवीर :

संभाजीराव पाटील : 27384

अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी :

रामचंद्र कांबळे : 27926

महिला राखीव प्रतिनिधी :

क्रांती उर्फ अरुंधती पाटील : 27467

रंजना पाटील : 26612

इतर मागासवर्गीय प्रतिनिधी :

फिरोजखान पाटील : 27360

भटक्या विमुक्त जाती जमाती प्रतिनिधी :

रावसो खिलारी : 28308

 

परिवर्तन आघाडी :

उत्पादक गट क्रमांक एक राधानगरी :

विठ्ठलराव खोराटे : 20807

ए. वाय. पाटील : 21700

नंदकिशोर सूर्यवंशी : 20565

उत्पादक गट क्रमांक दोन राधानगरी :

एकनाथ पाटील : 20209

अशोक फराकटे : 20439

युवराज वारके : 20118

उत्पादक गट क्रमांक तीन कागल :

बाबासाहेब पाटील : 21616

संजय पाटील : 19165

बालाजी फराकटे : 20807

उत्पादक गट क्रमांक चार कागल :

जयवंतराव पाटील : 21120

रणजितसिंह पाटील : 20792

चंद्रशेखर सावंत : 20281

उत्पादक गट क्रमांक पाच भुदरगड :

अर्जुन आबिटकर : 22748

दत्तात्रय उगले : 19682

मदनराव देसाई : 18966

नाथाजी पाटील : 19374

उत्पादक गट क्रमांक सहा भुदरगड :

पांडुरंग डेळेकर : 20247

के. जी. नांदेकर : 20758

विलास बेलेकर : 19888

उत्पादक गट क्रमांक सात करवीर :

सुमित चौगुले : 22009

अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी :

बाळकृष्ण भोपळे : 21491

महिला राखीव प्रतिनिधी :

कावेरी पाटील : 21559

संपदा पाटील : 20600

इतर मागासवर्गीय प्रतिनिधी :

विजय बलुगडे : 21572

विमुक्त जाती भटक्या जमाती प्रतिनिधी :

तानाजी सणगर : 20657

मुख्य संपादक राहुल वैराल

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश policetimesnews24x7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.