राज्य उत्पादन शुल्क विभाग कोल्हापूर कार्यालया बाहेर आर पी आय आठवले गटातर्फे तीव्र आंदोलन

कोल्हापूर:- राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालय कोल्हापूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने पक्षाचे जिल्हा सचिव सतीश माळगे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने करून आंदोलन करण्यात आले, कळे, तालुका. पन्हाळा येथील गट नं १०७१ मधील ग्रामपंचायत मिळकत न,१३६४ मधील हॉटेल सिद्धराज बिअर बार व परमिट रूम चे मालक शांताबाई चौगुले, त्यांचा मुलगा संदीप चौगुले, हे दोघे मायलेक सदर परवान्याचा गैर वापर करून, शासनाच्या परवानगीशिवाय भाड्याने देण्याच्या नावाखाली मागासवर्गीय समाजातील बेरोजगार व्यवसाय ईछुक लोकांना हेरून,त्यांच्याकडून डिपॉझिट च्या बहाण्याने लाखो रुपये, उकळून ११ महिन्याचा करार करायचा आणी काहीतरी कारणावरून त्यांना पिटाळून लावायच , तसेच सदर रक्कम गिळंकृत करायची, यांच्यामुळे अनेक बेरोजगार मागासवर्गीयांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले असून, सदर आंदोलनालात राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, यावेळी आंदोलनाची तीव्रता पाहून अधीक्षक रवींद्र आवळे यांनी चौकशी आहवाल मागवून घेवून कारवाई करण्यास लेखी आश्वासन दिल्यानंतर दहा दिवसांची मुदत घेतली, दहा दिवसात लायसन रद्द न केल्यास जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पक्षाच्या महिला आघाडीच्या नेत्या रुपताई वायदंडे यांनी दिला, सदर चे आंदोलन हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे महाराष्ट्र राज्य संघटन सचिव प्राध्यापक शहाजी कांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले, या आंदोलनामध्ये अक्षय साळवे प्रदीप ढाले खंडेराव कुरणे संबोधी कांबळे सलमान मोलवी अमर दाभाडे बाळासो कांबळे प्रताप बाबर गणेश माळगे रणजीत हळदीकर वैभव सुतार अमर तांदळे कुणाल जगधने संजय चव्हाण केदार बांदिवडे आनंद भामटेकर बाबासो धनगर भामटेकर सर्जेराव कांबळे सतीश जाधव विजय सकट पुष्पा नलवडे रूपाली कांबळे छाया बाबर संगीता चव्हाण यांच्यासह रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.