घरगुती विज चोरीमुळे भाटगांव ता. चांदवड येथील विद्युत व्यवस्थापक वायरमनच् त्रस्त
ज्ञानेश्वर पोटे

गावातील ग्रामस्थांना विजेच्या लपंडावापासून मुक्तता मिळावी यासाठी भाटगांव ता.चांदवड येथे अक्षय प्रकाश योजना………चालू झाली,पण भाटगांव येथील घरगुती वीज चोरी काही थांबलेली नाही. महावितरण कडून सुरळीत वीज मिळण्यासाठी मीटर कनेक्शन न घेता सर्रास तारेवरती आकडे टाकून वीज चोरी केली जाते तसेच ज्यांच्याकडे मीटर कनेक्शन आहे,ते देखील ग्राहक वीजेवरील हाय पावर वर चालणारी शेगडी,हीटर वापरण्याकरता तारे वरती आकडे टाकतात त्यामुळे खंडित होणारा वीज पुरवठा पुन्हा सुरळीत चालू ठेवण्यासाठी रात्री बे रात्री विद्युत व्यवस्थापक आणि वायरमन यांना शारीरिक धोका पत्करून तारेवरची कसरत करावी लागते.वैयक्तिक वीज ग्राहकांनाही समज देण्यात आली. महावितरण विभागाकडून वेळोवेळी धाडसत्रही अवलंबण्यात आले,तरी पण वीज चोरी काही थांबत नाही नियमित वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना या सततच्या वीजचोरीमुळे आणि खंडीत वीजपुरवठा मुळे विजेचे बिल भरूनही सकाळ संध्याकाळ अंधारात राहावे लागते त्याचे बोल वायरमेन व विद्युत व्यवस्थापक यांना ऐकावे लागतात.त्यामुळे वायरमन व विद्युत व्यवस्थापक यांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागतो.