भरवस फाटा येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या समर्थ नार्थ रास्ता रोको——
प्रतिनिधी श्री. ज्ञानेश्वर भवर.

सविस्तर वृत्त असे की, मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी श्री. मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसले आहे. शासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही. या आरक्षणाला सकल मराठा समाज 46 गाव निफाड पूर्व यांनी एकत्र येऊन एक आगळे वेगळे रास्ता रोको आंदोलन केले. प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून आरती झाली नंतर रास्ता रोको करण्यात आला. 46 गाव निफाड पूर्व भागातील सर्व मराठा बांधव एकत्र येऊन ‘ एक मराठा लाख मराठा’ जय भवानी जय शिवाजी , आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाच, कोण म्हणतं देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही अशा स्वरूपाच्या घोषणा देत सकल मराठा बांधव तब्बल २ तास रस्ता रोको करण्यात आला . मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत मरळगोई येथील मराठा बांधव अमित भाऊ मुद्गुल यांनीही आमरण उपोषणास बसले आहे . हजाराच्या संख्येने उपस्थित असलेले मराठा बांधव महिला एकत्र येऊन रास्ता रोख केला रास्ता रोकोची दखल घेत नायब तहसीलदार मॅडम यांनी मराठा समाजाचे लेखी स्वरुपात निवेदन घेतले हे शासनदारी पोचून याचा लवकरच पाठपुरावा करा अशी काही दिली नंतर प्रशासनाने दीर्घकाळ रस्ता रोको करता येणार नाही अशी सांगून रास्ता रोको हा थांबवण्यात आला. सकल मराठा बांधवांनी आंदोलनाला कुठल्याही प्रकारचे गाल बोट न लावता रास्ता रोको व्यवस्थित पार पाडला त्यानंतर सकल मराठा बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांना कुठल्याही प्रकारचा आघात झाल्यास सकल मराठा बांधव पेटून उठेल तसेच 31 10 2023 रोजी संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक दिली. सर्व व्यवहार, दुकाने सरकारी कार्यालय, (परीक्षा कालावधी असल्याने शाळा वगळता) सर्व बंद राहील. याची समस्त ग्रामस्थ भरवस फाटा व ४६ गाव यांनी नोंद घ्यावी असे आव्हान केले.