भाटगांव येथे सकल मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ गाव बंद आंदोलन
ज्ञानेश्वर पोटे

मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी श्री.मनोज जरंगे पाटील हे आमरण उपोषणाला बसले आहे,शासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही.या आरक्षणाला सकल मराठा समाज भाटगांव यांनी एक दिवसीय गावबंद आंदोलन करून करून जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणास जाहीर पाठिंबा दिला. याप्रसंगी प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून नंतर एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या.जय भवानी जय शिवाजीच्या नावाने परिसर दुमदूमून गेला होता.आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं कोण म्हणतं देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही अशा स्वरूपाच्या घोषणा देत सकल मराठा बांधव यांनी घोषणाबाजी केले. यावेळी सर्व प्रकारच्या राजकीय पुढार्यांना गाव बंद करण्यात आले.त्यांनी कुठल्याही कार्यक्रमाप्रसंगी गावात प्रवेश करू नये,अन्यथा त्यांनी गावात प्रवेश केल्यानंतर जो काही जो काही सकल मराठा समाजाचा रोष असेल त्यास सर्वस्वी राजकीय पुढारी जबाबदार असतील,असा निर्णय सर्व गावकऱ्यांच्या वतीने घेण्यात आला.याप्रसंगी श्री गणेश वामन वाघ,समाधान पगार,केदू पवार,चिराग वैराळ,रावसाहेब पोटे,गणेश पोटे,अनिल पोटे,रावसाहेब वाघ,कैलास समवंशी,राजू पोटे,बापू पगार,किरण भवर,किरण मोरे,भाऊसाहेब वाघ,दिलीप पोटे,नामदेव पोटे,अशोक पवार,सागर पोटे,राहुल पोटे आदी सर्व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.