
मिळालेल्या माहितीनुसार काल शनिवार 16 /३ रोजी अविनाश बाळू धवणे (34) हा आपल्या तीन ते चार मित्राबरोबर इंदापूर येथील जगदंबा हॉटेलमध्ये जेवणासाठी आला असता ते जेवण करत असताना अचानक पाच ते सहा जण येऊन त्यांच्यावर हल्ला केला. त्यातील एकाने अविनाश धवणे यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या त्यातील एक गोळी डोक्याच्या उजव्या बाजूला लागली तर दुसरी उजव्या पायाच्या जागेत घुसली त्यामुळे तो जागेवरच कोसळला. नंतर त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. व त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. या घटनेमुळे पुण्यातील इंदापूर भागात सर्वत्र खळबळ उडाली आहे. घटना घडल्यानंतर काही वेळातच पोलीस घटनास्थळी पोहोचले व घटनेचे तपास कार्य चालू केले. व मारेकरी याचा शोध घेण्यात चालू केले. अवि अविनाश चे मित्र खूप घाबरले व ते पळून गेले. पोलिसांनी पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्ग, बाह्य वळण रस्त्यावर नाकाबंदी केली असून अविनाश धावणे व त्याचे मित्र हे देखील गुन्हेगार असल्याचे पोलीस तपासात समोर आले. अद्याप अविनाश चे मारेकरी सापडले नसून पोलीस तपास करत आहेत.