महाराष्ट्र शासनाच्या पंढरपूर येथील शाहिरी प्रशिक्षण शिबिराचे प्रशिक्षक म्हणुन उत्तम गायकर यांची निवड !
संपादक सोमनाथ मानकर

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई आयोजित श्रीक्षेत्र पंढरपूर येथे शाहिरी प्रशिक्षण शिबिरात इगतपुरी तालुक्याचे कलाभूषण शाहीर उत्तम गायकर यांची शाहिरी प्रशिक्षक म्हणून महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी नेमणूक केली आहे .
सदरचे शाहिरी प्रशिक्षण १३ मार्च ते ३१ मार्च २०२३ या दरम्यान सद्भावना भवन, श्रीक्षेत्र पंढरपूर येथे शाहीर सुभाष गोरे शाहिरी प्रशिक्षणाचे शिबीर संचालक नियोजन करत आहे .
या शाहिरी शिबिरामध्ये महाराष्ट्रातील नामवंत शाहीरांचे व्याख्यान तथा पोवाडे गायन , शाहिरी परंपरा व इतिहास , शाहीर ते शाहिरी वाङ्मय , डफ सादरीकरणाचे महत्त्व , पारंपारिक ओवीची मांडणी, शाहिरी साहित्यातील विविध अंगाची ओळख , शाहिरी फटका तथा ऐतिहासिक पोवाडे , स्वातंत्र्य लढ्यातील शाहिरांचे योगदान, समाज परिवर्तनातील शाहिरांची योगदान , शाहिरीक्षेत्रात महिलांचे योगदान , भेदिक शाहिरी, प्रसार माध्यमांद्वारे शाहिरीची वाटचाल, लोककलेचा अभ्यास व चर्चा, मनोरंजनातून प्रबोधन शाहिरी , हिंदी मराठीतून कानडी भाषेतून केलेली शाहिरी मांडणी ,दूरदर्शन ,मीडियावरील सादरीकरण व त्याचे प्रात्यक्षिक यावरील मार्गदर्शन व सादरीकरण करण्यासाठी शाहीर बाळासाहेब मालुसकर (पुणे) शाहीर नानाभाऊ परिहार (जालना) शाहीर राजेंद्र कांबळे (अकलूज सोलापूर) शाहीर हिंदुराव लोंढे (इचलकरंजी कोल्हापूर) शाहीर शिवाजी शिंदे (अहमदनगर) शाहीर अवधूत विभूते (सांगली)शाहीर उत्तम गायकर (वाघेरे – नासिक) शाहीर अनिता खरात-ऐवळे (चिंचणी सांगली) शाहीर आप्पासाहेब उगले (जालना) शाहीर बजरंग आंबी (सांगली) शाहीर रामचंद्र जाधव (सांगली) शाहीर अवधूत पवार (मिरज) शाहिरा कल्पना माळी (सांगली) शाहीर देवानंद माळी (सांगली) प्रा. आनंद गिरी (शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर) शाहीर आनंद कुमार साळुंखे (सांगली) शाहीर रमेश गिरी (नांदेड) प्रा. सयाजीराव गायकवाड (कोल्हापूर) शाहीर शिवाजीराव पाटील (जळगाव) प्रा. गजेंद्र गवई (बुलढाणा) शाहीर रामानंद उगले (जालना) व शाहिरी शिबिराचे शिबिर संचालक शाहीर सुभाष गोरे इ. नामवंत शाहीर सहभागी होणार असल्याची माहिती शाहीर उत्तम गायकर यांनी दिली आहे .भारत सरकारच्या सूचना व प्रसारण मंत्रालय तथा महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मुंबई यांच्यावतीने निवड असलेले वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद तसेच मा. राज्यपालांच्या हस्ते जागतिक दर्जाच्या पुरस्काराने सन्मानित कलाभूषण शाहीर उत्तम गायकर यांची श्रीक्षेत्र पंढरपूर येथील शाहिरी प्रशिक्षणात प्रशिक्षक म्हणून निवड होणे.ही त्यांच्या कार्याची पावती असल्याने सर्वच स्तरातून त्यांच कौतुक होत आहे .