नांदूर मधमेश्वर धरणातील पानवेली तातडीने काढण्यात यावे पालकमंत्री दादाजी भुसे साहेबांकडे शिवसेना तालुका प्रकाश सर्जेराव पाटील यांची मागणी.
मुख्य संपादक राहुल वैराळ

नांदूर मधमेश्वर धरणातून शेकडो गावांना पिण्याच्या पाण्या पुरवठा करण्यासाठी शासकीय योजना कार्यान्वित आहे परंतु धरणातील गाळ हा धरण बांधल्यापासून आजपर्यंत काढण्यात न आल्यामुळे 80 टक्के धरण हे गाळणे भरलेले आहे 20% पाणी आहे त्यातच नाशिक महानगरपालिकेच्या आड मोठेपणामुळे नाशिकच्या सर्व पानवेली गोदावरी नदी द्वारे वाहत येऊन धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात जमा झाले आहे त्यामुळे मोठे प्रदूषण निर्माण झाले आहे याची माहिती वन विभागाने देखील मनपाकडे पत्र पाठवून कळवली आहे त्या पानवेलीमुळे शुद्ध पिण्याच्या पाणीपुरवठ्यावर गंभीर असा परिणाम होत आहे याचे कारण की पानवेली मोठ्या प्रमाणात धरणात जमा झाल्यामुळे पाणी हे पिवळे पडण्यास व त्यांची दुर्गंधी येण्यास सुरुवात झाली आहे त्यातच पाऊस देखील लेट असल्यामुळे ऑगस्ट महिन्यापर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन हे शासनाला करावे लागणार आहे त्यामध्ये पानवेलींचा लवकरात लवकर बंदोबस्त न केल्यास निफाड येवला सिन्नर या तालुक्यातील पिण्याच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या लाखो नागरिकांना प्रदूषित पाण्यामुळे आरोग्याच्या त्रासात सामोरे जावे लागणार आहे तरी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी महसूल विभाग पाटबंधारे विभाग वन विभाग यांच्या संयुक्त रित्या तसेच नगरपालिकेच्या बोटीद्वारे संपूर्ण पानवेली तात्काळ काढण्यात बाबत सूचना कराव्या अशा प्रकारची मागणी पालकमंत्री दादाजी भुसे साहेब यांच्याकडे शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश सर्जेराव पाटील व सिन्नर पंचायत समितीचे माजी सभापती उद्धवजी सांगळे यांनी केली आहे तसेच निवेदनाची पुस्तक नाशिक जिल्हाधिकारी डी गंगाधरण सो, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमिषा मित्तल मॅडम यांना देखील दिले आहेत